
मी येणार नाही
आभाळाचा तुझा खंड अभेद्य आहे
डागाळलेल्या चंद्राची कोर तू लेवू नकोस
मी येणार नाही
आंदणाच्या जराने ओठ उष्टावला आहे
बस्स आणखी काही मला तू भरवू नकोस
मी येणार नाही
तुझ्या दारात उंबर्यापाशी येवून जाईन
तुझे मांगल्याचे चांदणे दुरून नेसून जाईन
पण घरात मला नेवू नकोस
मी येणार नाही
तुझ्या चांदण्यात मी जळून जाईन
माझ्या हृदयात तुझे हृदय वितळून जाईल
पुन्हा मला बोलावू नकोस
मी येणार नाही
....कविता
रविवार 24 जुलै 2011
मी येणार नाही
12-56-00 pm
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबले: Marathi poem , कविता , मराठी , मराठी कविता
लेबले: Marathi poem , कविता , मराठी , मराठी कविता
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)












0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा